बुधवार, ६ ऑगस्ट, २००८

दिनांक २५ जुलाई पोस्ट च्या कमेन्ट चे उत्तर

माननीय श्री वैद्य आणि श्री ठाकरे यांचे त्यांनी पाठविलेल्या प्रतिक्रियांबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. मी माझ्या लेखात स्वतः बद्दल केवळ एवढ्या साठी उल्लेख केला आहे जेणे करून प्रत्येक मराठी व्यक्तीने (त्यात मराठी शिकलेलेही ओघाने आलेच) निदान माझ्या उदाहरानावरून बोध घ्यावा आणि तसे आचारानात आणावे.विशेष करून महाराष्ट्रात समोरच्याशी संवाद साधताना (तो अमराठी असला तरीही) मराठीचाच अवलंब करावा.अकारण हिन्दी अगर दुसरी कुठली भाषा वापरू नये. खरे तर सामान्य मराठी माणसाला हिन्दी बोलण्याचा दुर्धर आजार लागला आहे। तो रोग दूर करणे नितांत गरजेचे आहे.मराठी नामशेष होणार नाही ती होऊ नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहेच ,परंतु चित्र भयावह आहे। वर्तमान पत्रातील लेखात मी काही उदाहरण दिली आहेत। "हल्ली शहरातिलच नव्हे तर गावा खेड्यात देखिल इतकेच काय माझ्या उर्जाग्राम ताडालित (जे खेड्या पेक्षा लहान एक वसाहती सारखे आहे) पण दोन चार अशी मराठी कुटुम्बे आहेत ज्यांच्या कड़े नवरा बायको मधील संवाद मराठीत कमी नि हिंदीत जास्त होतो.त्यांच्या मुलांना साहजिकच मराठी, पाल्कान्पेक्षा कमी येनार । आता कल्पना करुया पुढच्या पीढी ची, तिला अजुन कमी मराठी येणार। क्रमाने काही पिढ्या उलटल्या नंतर मराठी त्या त्या घरातून नामशेष नाही का होणार ?" हेच वास्तव आहे। आपण अजुन जागे झालो नाही तर खरच महाराष्ट्रातुन मराठी नामशेष होउन जाईल। त्याला काही पिढ्या लागतील, आपण ते बघायला हयातित राहणार नाही कदाचित ,पण ते दुर्दैव अवघ्या महाराष्ट्राला बघण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुरोगामी तत्वाप्रमाने नवीन बदल आत्मसात करणे वा सामावून घेणे ही बाब प्रत्येक गोष्टिलाच लागू पड़ते.मायबोली ही त्यास अपवाद नाहीच पण प्रथम सर्वानी मराठी भाषेत बोलणे, हे गरजेचे नव्हे अपरिहार्य आहे असे मला वाटते.

1 टिप्पणी:

Vivek म्हणाले...

Mr. Deeak rairkar


thank you for opening Blog.there should be a one separate page for Marathi Manus ,that content only explores, information ,News about Univers,Nations,India,and Maharashtra, Mumbai!(Sorry,sorry!not Univers,not Nations not India but only Maharashtra and Mumbai.)where Marathi Manus can take part ,his aticipation,his presence, so he can make cash which he don’t know and Non Maharastrians are enjoying it and making Money.
I thing dozens of Marathi Columnist can write on this topic .
My suggestions is Marathi Manus should have knowledge that millions of Rupees transactions’ are going in Maharashtra. But very few Marathi's are involve in it.handred's of tender for different works are allotting every day, but there are all Non Maharashtrian.are there.there is lot of demand and supply
for daily required Material Like grocery ,food ,medical ect. But there is no Marathi Manus in it. All this is cash making And this MONEY is more than what Marathi Manus earn in his life time employment.
My suggestion is focus on this point. So that Marathi Manus should know want wrongs happen with him .and now what nest? how to out come this ?
who will guide him? How to catch money which is floating all around him .
we should explore all these thing ,so than Marathi will stay in Maharashtra.