शनिवार, २६ जुलै, २००८

Marathi

नमस्कार मंडळी, प्रथम मी माझा परिचय करून देतो.माझे नाव दीपक गजानन राइरकर.मी कोल इंडिया लिमिटेड (भारत सरकार चा उपक्रम ) च्या वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (नागपुर मुख्यालय) च्या चंद्रपुर जिल्ह्यातील ताडाली या गावी असलेल्या मध्यवर्ती कार्यशालेत कार्यकारी अभियंता (यांत्रिक) या पदावर रुजू असून इथल्या उर्जाग्राम वसाहतीत वास्तव्यास आहे.शास्त्रीय आणि सुगम संगीत (गायन),विविध भाषा शिकणे,त्या भाशांतुन गाणे,रेलवे बद्दल माहिती संग्रह करणे,प्रवास करणे,थोड़े फार लिखाण करणे (मराठी सह अवगत भाशांतुन), भाषांतर (विविध साहित्य) करणे माझे प्रमुख छंद.परंतु मराठीचे जतन करण्यासाठी ध्यास घेतलेला मी एक मराठी वेडा (मराठीचा आग्रही) माणूस आहे.मराठी माणूस मराठी माणसाशी मराठीतून न बोलता हिंदीतून वा इंग्रजीतून बोलताना दिसल्यास मला प्रचंड त्रास होतो.महाराष्ट्र सोडले तर इतर भाषा भाशकाना आपापल्या प्रांतीय भाषांचा सार्थ अभिमान असतो पण मराठी माणसाला मायबोलिबद्दल आदर नाही.या विषयाला धरून मी थोड़े फार लिखाण केले आहे जे महाराष्ट्रातल्या आघाडीच्या वर्त्तमान पत्रांतुन (लोकसत्ता,लोकमत,सकाळ,तरुणभारत,सामना इत्यादि) आणि किर्लोस्कर,चपराक इ.मासिकातुन प्रकाशित झाले आहे.सम्पूर्ण महाराष्ट्र मराठीमय व्हावे हे माझे स्वप्न आहे आणि त्यासाठी मी झटत आहे।
एक बाब मला आवर्जुन सांगाविशी वाटते की आमच्या तीन पिढ्या बिहार मध्ये वास्तव्यास गेल्या आणि अर्थातच माझाही जन्म तिथलाच. जन्मापासून शिक्षण ,नोकरी वगेरे घेउन आयुष्याची तीस ते पस्तीस वर्षे बिहार मध्येच घालवलीत. परंतु मराठी भाषा नि संस्कृति जपली व टिकवून ठेवली ती इतपत की बोलताना कुणालाही मी पुन्याचाच वाटेन.मराठीचा गंध नसताना आणि कुठलेही शालेय वा औपचारिक शिक्षण न घेता मला लिखाण देखिल करता आले त्याचे सम्पूर्ण श्रेय माझ्या कै.आई बाबांचे.त्यांचे ऋण फेड़ने या जन्मी तरी केवळ अशक्य.

८ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Unknown म्हणाले...

Aaplya baddal chi mahiti aahech. Aplya karyat aapnas yash yave hi manoman iccha tasech parmeshwara jawal prarthana. Aple nischitach kautuk karaila have, karan aapan itki varshe tihi aain tarunnyachi praprantiyat ghalavilya nannter itke sunder "Marathit" lihine va tyacha aabhiman aasne aani tya saathi sarvate prayatna karne hi durmil aasich babaahe. Veloveli bhetuch.

Tumcha,
VAIDYA.....
(Mulund-E)

Unknown म्हणाले...

Namskar Dipakrao,
I am very much pleased by your keen interest to save and promote the use of our mayboli.I am realy proud of you.I assure you that marathi language will never comes to an end, never.Only thing is that one has to adopt the changes taking place around.Please forgive me as I could not wrote this in mayboli owing to lacking marathi typing.Thanks. Dr.Suresh Thakare

Sunil Patankar म्हणाले...

ब्लॉग पाहून आनंद वाटला.

मराठीबाबत चळवळ करणार्या व्यक्तींनी तथा संघटनांनी खालील दोन गोष्टी करणे आवश्यक आहे.

१) आपले उद्दिष्ट स्पष्टपणे, तपशीलवार, सविस्तरपणे लीहीणे.

२) ते उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहेत ते ठरविणे, त्या गोष्टी कोणी व कधी करावयाच्या याची निश्र्चित योजना करणे.

जर ठरविलेले उद्दिष्ट मराठी बोलणार्या सर्व किंवा जास्तितजास्त समाज घटकांच्या हिताचे असेल तर या चळवळीत अधिकाधिक माणसे व संघटना सहभागी होण्याची शक्यत अधिक.

ठरविलेले उद्दिष्ट जितके अधिक स्पष्टपणे, तपशीलवार, सविस्तरपणे लीहीले असेल तितकी मन लाऊन व नेटाने काम करणारे कार्यकर्ते या चळवळीत शिरण्याची शक्यता अधिक. त्याचप्रमाणे गैरसमजुतीमुळे चळवळीत शिरून नंतर भ्रमनिरास झाल्यामुळे निष्क्रीय झालेले सदस्य तयार होऊन चळवळीची गती व चळवळीची परिणामकारकता कमी होण्याची शक्यता कमी होईल.

त्याचप्रमाणे ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आखलेली योजना जितकी स्पष्टपणे, तपशीलवार, सविस्तरपणे लिहिली गेली असेल तीतकी या चळवळीत आपण सिंहाचा नाहीतर निदान खारीचा तरी वाटा उचलु शकतो अशी जाणीव होऊन अनेक छोटीमोठी कामे नेटाने मन लाऊन व चटकन करणारी (नुसत्याच गप्पा मारणारी नव्हेत)असंख्य माणसे या योजनेत सहभागी होतील.

जर आपले विचार दुसर्याला कळावे एवढेच भाषेचे प्रयोजन असते तर अनेक भाषांची जगात निर्मिती झाली नसती. पण आपण भाषेचे अजून एक महत्वाचे प्रयोजन आहे हे विसरतो. श्र्वापदांना आपले क्षेत्र आखण्यासाठी आपल्या मुत्राचा वापर करावा लागतो, माणसांसाठी हेच काम भाषा करीत असते. म्हणून जगात असंख्य भाषा आहेत.म्हणूनच जेते नेहमी पराजितांची भाषा दाबून टाकतात.

महाराष्ट्र राज्यावर जर लवकरात लवकर मराठी भाषेचे राज्य आपण मराठी माणसांनी आणले नाही तर महाराष्ट्र राज्य ही नकाशातील केवळ एक आकृती राहील. काही वर्षांनी ती सुद्धा पुसली जाईल. आपण बेघर,निर्वासित होउ.

एकभाष (चुकिच्या भाषेचा) भारतापेक्षा बहुभाष भारत (प्रत्येक घटक राज्यावर त्या राज्याच्या भाषेचे राज्य) हा निश्र्चितच अधिक सुखी समृद्ध व सामर्थ्यवान देश असेल.

Vivek म्हणाले...

Mr. Deepak Rairkar,
Congratulation , I am very happy when I get news that your BLOG appear on net. Best of luck .
Your blog is very helpful for all Marathi Manus , and it will encourage we all to prosper our Marathi Sanskriti in Maharashtra . So always go on writing .
We all Marathi Manus should have communication with each other so we can solve our problems untily.
More than 100 Marathi student were pass in IIT exam, 2008,no doubt they are more than last years result ,but Non-Maharashtrian count far more than Marathi student ,it’s not mean that Marathi student aren't cleaver to pass IIT exam. Lot of Marathi student all over Maharashtra didn’t have knowledge of IIT exam, so we have to encourage all Marathi student of town, Village ,small Village to take admission in IIT , so that more and more Marathi student will take admission in IIT.
Our target is encourage Marathi Manus make use of this faculty which is for Marathi Manus in Maharashtra.
My Marathi font is not work on your blog.
Please ,follow my problem.
Rairkar Saheb thank you ,we will support you for your Marathi love.
Dhanywad,

Vivek Patil

9987547337

Vivek म्हणाले...

Mr. Deepak Rairkar,
Congratulation , I am very happy when I get news that your BLOG appear on net. Best of luck .
Your blog is very helpful for all Marathi Manus , and it will encourage we all to prosper our Marathi Sanskriti in Maharashtra . So always go on writing .
We all Marathi Manus should have communication with each other so we can solve our problems untily.
More than 100 Marathi student were pass in IIT exam, 2008,no doubt they are more than last year result ,but Non-Maharashtrian count far more than Marathi student ,it’s not mean that Marathi student s are not cleaver to pass IIT exam. Lot of Marathi student all over Maharashtra didn’t have knowledge of IIT exam, so we have to encourage all Marathi student of town, Village ,small Village to take admission in IIT , so that more and more Marathi student will take admission in IIT.
Our target is encourage Marathi Manus make use of this faculty which is for Marathi Manus in Maharashtra.
My Marathi pont is not work on your blog.
Please ,follow my problem.
Rairkar Saheb thank you ,we will support you for your Marathi love.
Dhanywad,

Vivek Patil

9987547337

अनामित म्हणाले...

नमस्कार,
आपला सकाळ मधला दि. ८ ऑक्टोबरचा लेख वाचला. मराठीच्या उन्नत्तीसाठी आपण चालवलेल्य़ा मोहिमेबद्दल अभिनंदन.
मराठी भाषेवरील लेखांवर मला देवनागरीत प्रतिक्रिया अपेक्षित होत्य़ा. इंग्रजी भाषेत आणि रोमन लिपीत लिहिलेल्य प्रतिक्रिया वाचून वाईट वाटले. इंटरनेटवर देवनागरीमध्ये स्वत:चे विचार मांडणे आता सोपे झाले आहे.
मराठीतले विचार रोमन लिपीमध्ये टाईप करून देवनागरीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी ट्रांसलिटरेशन टूल फुकट उपलब्ध आहेत. गुगल वर ट्रांसलिटरेशन टूल चा शोध घ्या. फ़्री सॉफ्टवेअर डाऊन लोड करा. ती कशी वापरायची याचा अभ्यास करा. नावापूरती राहिलेली मराठी जिद्द प्रत्यक्षात दाखवली तर मरठी विचार देवनागरीत इंटरनेटवर थोड्याच वेळात प्रकाशित करायला लागाल.
दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजी शब्दांचे पर्याय शोधण्यात वेळ घालवू नका. प्रांतांवर देशाचा प्रभाव पडतो आहे; देशावर जगाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. कोणत्याही भाषा शुद्ध राहणार नाहीत. सर्व भाषा धेडगुजरी होणार आहेत.
भाषा हे विचारांचे वहन करणारे वाहन आहे. जरूरीप्रमाणे योग्य भाषा वापरा. महाराष्ट्रात मराठीमध्ये बोलल्याशिवाय निभाव लागणार नाही, असे वातावरण निर्माण झाले तरच परप्रांतिय मराठीत बोलतील. प्रांतीय स्तरावर असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे राज ठाकरे हे अपवादात्मक उदाहरण आहे. अपवाद नियमाला सिद्ध करतात. आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना तशी वातावरण निर्मिती करणे प्रशस्त वाटत नाही. मराठीचा फाजील अभिमान दाखवायचा नाही हा नियम आहे.
आपण हाती घेतलेले कार्य यशस्वी होवो, ही सदिच्छा व्यक्त करून माझी प्रतिक्रिया थांबवतो.

Deepesh Gautam म्हणाले...

नमस्कार महोदय,
आपके विचार बहुत अच्छे लगे
तुमच्या विचार खूब चांगले आहे | { मेरे द्वारा एक कोशिश है गलतियों को ध्यान न दे )