गुरुवार, ९ ऑक्टोबर, २००८
सकाळ ८ ऑक्टोबर,२००८
श्री सुहास यांनी दिलेल्या कमेन्ट (प्रतिक्रिया) बद्दल मी त्यांचा आभारी आहे.संगणकाच्या बाबतीत मी अजून फारसा परिपक्व नाही.म्हणुन रोमन-मराठीत लिहिणे मला बरेचदा भाग पड़ते.त्याचा अभ्यास जोरात सुरु आहे हे सांगायला नको.आता कमेन्ट बद्दल बोलू या.मराठीच नव्हे इतर भाषा देखील भेसळ होत आहे हे खरे.परन्तु मराठी येत नाही वा शुद्ध बोलता येत नाही म्हणून हिंदीत (किंवा इंग्रजीत) बोलायचे हे चुकीचे, असे मी मानतो.शुद्ध येत नसेल तर वाक्यात एखाद दुसरे परकीय भाषेचे (त्यात हिंदी,इंग्रजी,फ्रेंच,जर्मन इ.काहीही असो) शब्द असले तरी एकवेळ चालेल (आज न उद्या ते शुद्ध होणारच) पण तसे न करता सरळ सरळ दुसरी भाषा आणि त्यात ही हिन्दी वापरायची हे बरोबर नाही.यात सर्वात मोठी अड़चन अशी की मराठी माणूसच मराठीचा वैरी आहे.मराठीला धोका मराठी माणसा कडूनाच होतो आहे.तेव्हा प्रथम आपण सर्वांनी या मुदया वर तरी निदान एकत्र यायला हवे आणि यात कुणी राजकारण (कृपया) आणू नये असे मनापासून वाटते.शाक्य असल्यास कृपया मोबाईल क्रमांक द्यावा.कमेन्ट साथी पुनश्च आभार.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)