बुधवार, ३० जुलै, २००८

Marathi

Shri Sunil yanchya comment che uttar:-

Prathm apan majhya article var awarjun comment (pratikriya) dilya baddal aaple abhar vyakt karto.

1)Uddisht ekach-Maharashtrala Marathimay karne.(Tyasathi Marathi laadavi laagli tari chaalel)

2)He uddisht gaathnyasaathi ji paaule uchalne kramprapt ahet,tyapaiki ek sarvaat mahatvache aani sarvaat sope mhanje Marathitun bolne.Maharashtrat sarvatra Marathit bolne. Marathi vyaktini Marathi vyaktishi boltana 100 takke Marathichach wapar karawa.Halli tase hot naahi ani haach sarvaat motha adthala aahe.

Aaplya baddal ajun mahiti milaki tar bare hoil (yatha aapla patta,fon nambar ityadi).Vistrut mahitisathi krupaya Mananiya Shri (pradhyapak) Anil Gore,Adhyaksh Samarth Marathi Sanstha,Pune yaanchyashi sampark saadhawa.

Dhanyawad.

शनिवार, २६ जुलै, २००८

Marathi

नमस्कार मंडळी, प्रथम मी माझा परिचय करून देतो.माझे नाव दीपक गजानन राइरकर.मी कोल इंडिया लिमिटेड (भारत सरकार चा उपक्रम ) च्या वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (नागपुर मुख्यालय) च्या चंद्रपुर जिल्ह्यातील ताडाली या गावी असलेल्या मध्यवर्ती कार्यशालेत कार्यकारी अभियंता (यांत्रिक) या पदावर रुजू असून इथल्या उर्जाग्राम वसाहतीत वास्तव्यास आहे.शास्त्रीय आणि सुगम संगीत (गायन),विविध भाषा शिकणे,त्या भाशांतुन गाणे,रेलवे बद्दल माहिती संग्रह करणे,प्रवास करणे,थोड़े फार लिखाण करणे (मराठी सह अवगत भाशांतुन), भाषांतर (विविध साहित्य) करणे माझे प्रमुख छंद.परंतु मराठीचे जतन करण्यासाठी ध्यास घेतलेला मी एक मराठी वेडा (मराठीचा आग्रही) माणूस आहे.मराठी माणूस मराठी माणसाशी मराठीतून न बोलता हिंदीतून वा इंग्रजीतून बोलताना दिसल्यास मला प्रचंड त्रास होतो.महाराष्ट्र सोडले तर इतर भाषा भाशकाना आपापल्या प्रांतीय भाषांचा सार्थ अभिमान असतो पण मराठी माणसाला मायबोलिबद्दल आदर नाही.या विषयाला धरून मी थोड़े फार लिखाण केले आहे जे महाराष्ट्रातल्या आघाडीच्या वर्त्तमान पत्रांतुन (लोकसत्ता,लोकमत,सकाळ,तरुणभारत,सामना इत्यादि) आणि किर्लोस्कर,चपराक इ.मासिकातुन प्रकाशित झाले आहे.सम्पूर्ण महाराष्ट्र मराठीमय व्हावे हे माझे स्वप्न आहे आणि त्यासाठी मी झटत आहे।
एक बाब मला आवर्जुन सांगाविशी वाटते की आमच्या तीन पिढ्या बिहार मध्ये वास्तव्यास गेल्या आणि अर्थातच माझाही जन्म तिथलाच. जन्मापासून शिक्षण ,नोकरी वगेरे घेउन आयुष्याची तीस ते पस्तीस वर्षे बिहार मध्येच घालवलीत. परंतु मराठी भाषा नि संस्कृति जपली व टिकवून ठेवली ती इतपत की बोलताना कुणालाही मी पुन्याचाच वाटेन.मराठीचा गंध नसताना आणि कुठलेही शालेय वा औपचारिक शिक्षण न घेता मला लिखाण देखिल करता आले त्याचे सम्पूर्ण श्रेय माझ्या कै.आई बाबांचे.त्यांचे ऋण फेड़ने या जन्मी तरी केवळ अशक्य.